शिरगाव ( निसार शेख )- वाढती मजुरी त्याचबरोबर मजुरांचा तुटवडा यामुळे अशातच शेतीसाठी होणारा खर्च कमी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील अजित शिंदे यांनी टाकाऊ वस्तुपासून भात झोडणीचे यंत्र तयार केले आहे.
भात झोडणी सुलभ व्हावी यासाठी बाजारात 18 हजारापासून कंपन्यांचे भात झोडणी यंत्र विकत मिळते. वर्षांतून एकदाच भात पीक घेतले असल्यामुळे ते यंत्र पुढे आठ महिने पडून राहते. यावर उपाय म्हणजे शिरगाव येथील शेतकरी अजित शिदे यांनी घरीच भात झोडणी मशीन बनविण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी भंगारातील टाकाऊ पत्रा,शेटरच्या पट्या, पंप,बेल्ट व बेरिग एकत्र करून मशीन बनविले याकामी त्यांना मित्र विनायक शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले मशीनच्या वरील बाजूवर पेंढा धरल्यावर शाफ्ट फिरल्याने पेंढ्याचे व शफ्टचे घर्षण होऊन भाताचा दाणा जमिनीवर पडतो अशा प्रकारे मशीन काम करते. 10 ते 12 माणसाचे काम फक्त दोन माणसे मशीन वर करतात. त्यामुळे अन्य मजुरी वाचते दिवसाला सातशे मण भात पडते मशीनसाठी त्यांनी 10000 रुपये इतका खर्च केला आहे. या भात जोडणी मशीनचा उपयोग पचकोशीतील अनेक शेतकरी बांधव यांना होतो.