चिपळूण ; मार्गताम्हानेत अखेर आठवडा बाजार सुरु

0
202
बातम्या शेअर करा

.
मार्गताम्हाने – कोरोना आपत्ती बंद करण्यात आलेला दर गुरुवारी भरणारा मार्गताम्हाने येथील आठवडा बाजार पुन्हा सुरु झाला आहे. याबाबतची माहिती मार्गताम्हाने बुद्रुकचे सरपंच प्रभाकर चव्हाण यांनी दिली.
मार्गताम्हाने बाजारपेठ येथे दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो. कोरोना आपत्तीत गेले 7 महिने हा बाजार बंद करण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाची स्थिती निवळत आलेली असून बाजारपेठ केव्हाच सुरु झालेली आहे. मात्र, आठवडा बाजार बंद असल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने आठवडा बाजार सुरु करण्याविषयी तालुका प्रशासनाला कळवून शासनाच्या अटी, नियमांच्या अधीन राहून हा बाजार सुरु करत आहोत, अशी परवानगी घेतली आहे. त्यामुळे आठवडा बाजार आज गुरुवारपासून भरला असून ग्राहकांची मोठी गैरसोय टळली आहे. ग्राहकांनी खरेदी करताना गर्दी करु नये, मास्कचा वापर करावा असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here