बातम्या शेअर करा

गुहागर – ( मंगेश तावडे ) – गुहागर-चिपळूण मार्गावरील मोडकाघर पूलच्या अपूर्ण कामामुळे संपूर्ण पावसाळा अतिरिक्त १५ किमीचा जादा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.मात्र आता पुन्हा एकदा पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून डिसेंबर अखेरपर्यंत पूल किंवा पर्यायी एकेरी मार्ग तयार करण्याचा प्रयत्न ठेकेदार करत आहे. त्यामुळे नववर्षाच्या प्रारंभाला या पुलावरून वाहतूक सुरू होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता आर आर मराठे यांनी व्यक्त केला आहे.

गुहागर-चिपळूण मार्गावरील मोडकाघर पुलाच्या कामाला २४ एप्रिलपासून सुरूवात झाली पावसाळ्या अगोदर पुलाचे काम पूर्ण होईल असा विश्वास ठेकेदाराने व्यक्त केला होता.
होईल, असा विश्वास ठेकेदाराने व्यक्त परंतु त्यामध्ये तो अपयशी
ठरला आहे आता पुन्हा एकदा या पुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे पुलाचे तीन खांब पूर्ण झाले आहेत. पुलाचा स्लॅप टाकणे शिल्लक आहे. यामध्ये मोडकाघर धरणात पाण्याचा साठा असल्याने या वर्षी अखेरपर्यंत पुलाचे काम होणे अशक्य आहे. असे असले तरी राष्ट्रीय महामार्गाच्या वतिने ठेकेदाराला पुलाचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठेकेदाराकडून पुलाच्या कामासाठी पुलाच्या दोन्ही बाजूना मातीच्या भरावाने रम्प तयार करण्याचे सुरू झाले आहे. या रम्पवर दोन लिफ्ट बसतील अशी व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे कामात अडथळा येत आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूना भराव करून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणी पातळीवर रॅम्प तयार करून दोन्ही बाजूचे काम करता येईल, अशी व्यवस्था केली जात आहे. यामुळे डिसेंबरअखेर पुलाचे काम ९० टक्क्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर मार्गताम्हाने ते चिखलीपर्यंतच्या मार्गावर काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर शृंगारतळी ते मोडकाघर कामाला सुरुवात केली जाणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here