चिपळूण – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीच्या पथकाने चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे छापा मारून मोहल्ला येथील गुलाम काद्री याच्याकडून ४.५२५ किलोचा ९०.५०० रुपये किमतीच्या गांजासह त्याला त्याब्यात घेतले.
रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक यांनी पोलीस प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवैध धंद्याविरुद्ध मोहीम सुरू करण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. याचा परिणाम म्हणून नजीकच्या कालावधीत अवैध हातभट्टीची दारू आणि जुगार व्यवसायातील अनेक गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण पिढी व अनेक नागरिक मादक द्रव्याच्या आहारी जात होते. या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन सामाजिक समतोल बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे मादक द्रव्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून नुकत्याच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे मादक द्रव्य बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील मोहल्ला येथे राहणारा एक इसम अंमली पदार्थ बिगर परवाना गैरकायदा ताब्यात बाळगून विक्रीचा व्यवसाय करत असल्याबाबतची गोपनीय बातमी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेली होती. या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक (गृह) रत्नागिरी यांच्यासमवेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पथका तात्काळ सावर्डे या ठिकाणी रवाना करण्यात आले. सदर पथकाने सावर्डे मोहल्ला येथे आज गुलाम महंमद काद्री हा राहत असलेल्या ठिकाणी छापा मारला असता गुलाब काद्री याचे ताब्यामध्ये एकूण ९० हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा अमली पदार्थ गैरकायदा मिळून आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याचे श्री चंद्रकांत लाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. एस. एल. पाटील पोलीस उपअधीक्षक (गृह) रत्नागिरी, श्री. हेमंतकुमार शहा पोलीस निरीक्षक स्थागुअशा रत्नागिरी, रत्नागिरी फॉरेन्सिक युनिटचे सपोनि श्री. पोटफोडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहवा संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, राजेश भुजबळराव, आशिष शेलार, पोना विजय आंबेकर, बाळू पालकर, उत्तम सासवे, अमोल भोसले, सत्यजित दरेकर, भास्कर धोंडगा, अमोल कांबळे, मपो हवा कोमल कदम, मपोना सांची सावंत, फॉरेन्सिक युनिटचे अक्षय कांबळे, श्रीकांत दाभाडे, श्वान हस्तक सुरज भोळे, नागनाथ पाचवे, संभाजी घुगरे व श्वान व्हिक्तर यांनी केलेली आहे