गुहागर -कोरोना संसर्गामध्ये गुहागर तालुक्यासाठी 108 ही रुग्णवाहिका पुरेशी नव्हती अशावेळी तालुक्यात आलेल्या मागणीनुसार गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार
भास्कर जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सुसज्ज रुग्णवाहिका गुहागर तालुक्यासाठीदिली आहे. आज गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर ही रुग्णवाहिका तालुक्यातील जनतेसाठी लोकार्पण सोहळा करून जनतेच्या सेवेसाठी दाखल केली आहे. ही रुग्णवाहिका स्वतः चालवून हा सोहळा पार पडला आपण केवळ पत्रव्यवहार करत बसलो नाही. तर येथील जनतेची निकड पाहता रुग्णवाहिका आणण्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन तालुका वासियांच्या सेवेसाठी आज दाखल केली आहे. असे मत व्यक्त केले