दुबई : आजपासून यूएईची राजधानी अबुधाबी, दुबई आणि शारजाह या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं बिगुल वाजणार आहे. पुढचे जवळपास दोन महिने यंदाच्या आयपीएल महासोहोळा रंगणार आहे. चॅम्पियन मुंबई इंडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग यांच्यात अबुधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमवर आज उद्घाटन सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वा. हा सामना खेळविला जाईल. त्यामुळे क्रिकेट रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा बंद दाराआड म्हणजेच रिकाम्या स्टेडियम्समध्ये खेळवली जाणार आहे.