चिपळूण -काल काही ठराविक व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन चिपळूण बाजारपेठ १० दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर आज चिपळूण बाजारपेठतील १८ व्यापारी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शासनाने बंद जाहीर केला तर आपण पूर्णपणे सहकार्य करू, मात्र आता बंद करणे छोट्या व्यापाऱ्यांना परवडणारे नाही.
‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेला सहकार्य करताना स्वतःसह नोकर व ग्राहकांची काळजी घेऊन व्यापार सुरु ठेवावा व कुठल्याही प्रकारचा बंद करू नये, असा एकमुखी ठराव १८ संघटनांच्या काही वेळापूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती नवयुग व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी दिली. या बैठकीला नवयुग व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर, कापड व्यापारी संघटनेचे अरुण भोजने, फुटवेअर असोसिएशनचे सूर्यकांत चिपळूणकर, टेलर असोसिएशनचे दिलीप हरवंदे, इलेक्ट्रिक संघटनेचे शिरीष मुळे, कापड व्यापारी संघटनेचे भारत रेडीज, अमित चिपळूणकर, फोटोग्राफर असोसिएशनचे सचिन शेठ, मटन-चिकन विक्री संघटनेचे बिलालशेठ पालकर, मच्छी विक्रेते संघटनेचे बाळशेठ पड्याळ, करामत मीठागरी, सुकीमच्छी असोसिएशनचे इक्बाल मिठागरी, कटलरी संघटनेचे उदय ओतारी, रोहन चौधरी, लॉन्ड्री संघटनेचे प्रकाश गांगण, हॉटेल संघटनेचे रमेश खळे, बॅग हऊस संघटनेचे असलम मेमन, राजू मेमन, हॉटेल वक्रतुंड, सुवर्णकार संघटनेचे पारस ओसवाल आदी संघटनांचे २८ पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.