चिपळूण – चिपळूण पंचायत समितीच्या शेष फंडातून घेतल्या गेलेल्या घरघंटीचा मोठ्या प्रकारे घोटाळा झाला असून या घरघंटी प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी रामपूर पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण यांनी केली आहे.
पंचायत समितीच्या शेष फंडातून घरघंटी ही नियमबाह्य खरेदी केली असून याबाबत आपण तात्कालीन सभापती यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी पंचायत समितीच्या सभागृहात या घटनेबाबत चौकशी केली जाईल असे सांगितलं होतं. मात्र असे असतानासुद्धा गेले अनेक दिवस या प्रकारे कोणतीही चौकशी केली गेली नसल्याने याप्रकरणात नक्कीच आर्थिक गैरव्यवहार झालेला असून ज्यांनी या पंचायत समितीच्या शेष फंडातून खरेदी केली व जी एजन्सी नेमली त्या दोघांची चौकशी करण्याची मागणी अनुजा चव्हाण यांनी केली आहे. तर याप्रकरणी चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सरिता पवार या सर्वतोपरी दोषी असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करून जोपर्यंत या विषयाचा छडा लागत नाही तोपर्यंत त्यांना चिपळूण मधून बदलीच्या ठिकाणी जाण्यास अटकाव करावा अशी मागणी सुद्धा अनुजा चव्हाण यांनी केली आहे.
एकीकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आणि असे असताना यात चिपळूण पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवसेना राष्ट्रवादी भाजप चे सर्व सदस्य मात्र शिवसेनेच्या महिला सदस्यांनी शिवसेनेच्या सभापती यांच्यावर असे आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले असून आता नक्की पुढे काय? शिवसेना याबाबत काय निर्णय घेणार? पंचायत समिती गटनेते राकेश शिंदे नक्की कोणती भूमिका मांडणार? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.