गुहागर – गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरच्या महिला मॅनेजरचा मृतदेह आज दाभोळ खाडीत सापडला आहे.
सुनेत्रा दुरगुडे असे या महिलेचे नाव असुन त्या चिपळूण येथील रहिवासी आहेत. त्या नेहमी चिपळूण ते वेलदुर असा प्रवास करत असत काल सायंकाळी त्या बँकेचे कामकाज आटपून बँकेतून रानवी येथे पर्यत आल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क झालेला नाही या बाबत पोलिसांना काल कळवले होते. असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
मात्र आज सकाळी दाभोळ खाडीतील फेरी बोट परिसरात एका महिलेचा मृतदेह
खाडीत तरंगत असताना दिसला त्यानंतर गुहागर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर. या बाबत अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.