गुहागर – देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात फळवाटप तर तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
भाजपाच्या वतीने दि.14 ते 20 सप्टेंबर दरम्यान प्रधानमंत्री मान मोदीजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून गुहागर तालुक्यातील गुहागर ग्रामीण रूग्णालय,तळवली,चिखली,हेवी, आबलोली,कोळवली या प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना फळवाटप करण्यात आले.तसेच अनेक ठिकाणी वृक्षारोपण,स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. फळवाटप कार्यक्रमावेळी गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे,भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, चिटणीस मंगेश जोशी, श्रीकांत महाजन,सरचिटणीस सचिन ओक, विजय भुवड, चिटणीस साईनाथ कळझुणकर,मधुकर असगोलकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय मालप, गुहागर शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, भाजपाचे गुहागर नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, सर्व नगरसेवक,भाजपाचे जिल्हा, तालुका, गुहागर शहर कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
 
             
		