बातम्या शेअर करा

खेड : दोन किलो सोने विक्रीच्या व्यवहारासाठी खेड तालुक्यातील मुंबई -गोवा मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळील जंगलात बोलावून 59 लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची घटना घडली अशी जोरदार चर्चा खेड मध्ये सुरू आहे.

एका बँकेचा म्यानेजर व एक सोनार 59 लाख रुपये घेऊन या जंगलात गेले होते. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. येथे व्यवहारासाठी गेल्यावर चोरट्यांनी सोने न देताच या दोघांना मारहाण करून रक्कम पळवली असे बोलले जात आहे. मात्र हे इतके पैसे आले कुठून ? नक्की अशी घटना घडली की नाही ? की हा केवळ बनाव आहे ? या प्रशांची उत्तरे सध्या खेड पोलीस शोधत आहेत. या घटनेबाबत अनेक कथा चर्चिल्या जात असून पोलीस तपासात आता नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here