चिपळूण – चिपळूण- करबवणे मार्गावर बेकायदा वाळु वाहतूक करणारा डंपर महसूलच्या भरारी पथकाला आढळल्यानंतर या प्रकरणी डंपर मालकास एक लाख ६४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे करबवणे खाडीत चोरट्या पद्धतीने वाळू उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
चिपळूण तालुक्यातील गोवळकोटसह करबवणे खाडीत बेकायदा वाळू उत्खनन सुरू असल्याचे गेले अनेक महिने या ठिकाणचे ग्रामस्थ तक्रार करून सांगत आहेत. मात्र असं असलं तरी प्रशासनाकडून त्याची काही दखल घेतली जात नव्हती मात्र यावर उपाय म्हणून प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी या वाळूच्या चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी भरारी पथक स्थापन केले. या पथकाच्या मार्गावर गस्त सुरू असतानाच गुरुवारी पाहटे नायब तहसीलदार तानाजी शेजवळ ,मंडल अधिकारी यांच्यासह गस्त घालणाऱ्या या पथकाने वाळूचा वाहतूक करणारा डंपर निदर्शनास आला त्या डंपरमध्ये तपासणी केली असता कोणतीही परवानगी नसताना त्यात वाळू भरलेली निदर्शनास आली म्हणून तो डंपर ताब्यात घेतला व त्यातील वाळूसह डंपर जप्त करून त्या मालकाला एक लाख 64 हजार चा दंड ठोठावण्यात आला.
सध्या वाळू उत्खननाला परवानगी नाहीये कुठेही उत्खनन होत नाही असं प्रशासन सांगत आहे मग वाळूची वाहतूक होतेच कशी त्यामुळे प्रशासनाने चोरट्या वाळूची होणारे उत्खनन त्वरित थांबवावा अशी मागणी होत आहे.