चिपळूण ; वाशिष्ठी नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट

0
171
बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पूल व संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद होते.
आज या स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती. अवजड वाहने महामार्गावरच उभी करण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस कर्मचारी महामार्गावर लक्ष ठेवून होते.

आज वाशिष्ठी पूला बरोबरच शास्त्री पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरु झाले मात्र सोनवी आणि बावनदी पूलाच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here