बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई – गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पूल ब्रिटिशकाळातील आहेत.त्यांच्या दुरुस्तीसाठी कित्येक वर्षात एक रुपयाही दिलेला नाही.असे असताना त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर खर्च कशासाठी ,पोस्टमार्टम केल्यानंतर मेलेला माणूस जिवंत होतो का ,असा सवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना केला.

या पदाधिकाऱ्यांनी महामार्गचे उपविभागीय अधिकारी आर.आर.मराठे यांची भेट घेतली.यावेळी चर्चेत पुलांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे सरकार स्ट्रक्चरल ऑडिटवर पैसा कशासाठी खर्च करत आहे , असा सवाल केला.या पुलाची क्षमताच संपुष्टात आल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे कमकुवत झालेला हा पूल हलतो असे सांगितले.यावेळी माजी सभापती शौकत मुकादम राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, माजी सरपंच विकास गमरे यावेली अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here