गुहागर – गुहागर तालुक्यातील नरवण येथे रेशन दुकान चालकाने नागरिकांसोबत दादागिरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असुन त्या दादागिरी करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुकानावर रेशन न्यायला आलेल्या ग्राहकाकडे नेटचे ज्यादा पैशाची मागणी केली असता पैसे द्यायला ग्राहकाने नकार दिल्यामुळे दुकानदाराने रेशन नाकारले. ग्राहकाने जाब विचारल्यानंतर शिवीगाळ करून मारण्याची धमकी त्या रेशन दुकान चालकाने दिली. असा हा व्हिडीओ आहे. त्या संबंधित प्रकारानंतर रेशन दुकान चालक वसंत देऊडकर याच्या विरोधात गुहागर तहसीलदार यांच्याकडे अमोल नाटूस्कर यांनी तक्रार केली.
दरम्यान रेशन दुकान चालकाच्या ददागिरीचा व्हिडीओ आणि संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.