चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहोळा कोरोनामुळे रद्द

0
884
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. सुभाषराव चव्हाण यांचा ७ सप्टेंबर रोजीचा अभिष्टचिंतन सोहोळा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रांत व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात व चिपळुणातदेखील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे या अशा परिस्थितीत चिपळूण नागरीचे सभासद, ठेवीदार , कर्मचारी व हितचिंतकांच्या आरोग्याची काळजी ही चिपळूण नागरी परिवाला असल्याने चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सुभाषराव चव्हाण यांचा सोमवार दिनांक ७ सप्टेंबर रोजीचा अभिष्टचिंतन सोहोळा रद्द केलेला आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा चव्हाण साहेब व चिपळूण नागरीच्या पाठीशी कायम आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. या परिस्थितीत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रामुख्याचे असल्याने आपण या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष येऊ नये ही नम्र विनंती. आपण घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, लि. चिपळूण मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here