रत्नागिरी – आजपासून ही पास बंद झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या सर्व सीमांवरील नाकाबंदी उठवण्याचे आदेश रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. त्याचप्रमाणे तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची स्क्रीनिंग सेंटरला नोंद करावी.
स्क्रीनींग सेंटरवर आल्यावर त्या व्यक्ती पंचावन्न वर्षाच्या आहेत किंवा कोव्हिडची लक्षणे आढळून येतील जसे की सर्दी, ताप,खोकला ,श्वसनाचा त्रास असणा-या व्यक्ती किंवा ज्या व्यक्ती दुर्धर आजाराने त्रस्त आहेत जसे उच्च रक्तदाब, मधुमेह,हृदयविकार वगैरे आजार असणा-या व्यक्ती अशा तिन्ही पैकी कोणत्याही बाबीसंबंधीच्या व्यक्तींची अँटिजेन /आर. टि. पी. सी.आर.अशी उपलब्धतेप्रमाणे टेस्ट करावी.तपासणी अंती येणा-या निकषांवर आधारित संबंधित व्यक्तींना आवश्यकते- नुसार संस्थात्मक/CCC/DCHC/DCHया ठिकाणी अलगीकरण /विलगीकरण/ उपचाराकरिता पाठविण्यात यावे.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी समन्वय करावा.तसेच जे प्रवासी स्क्रीनींग सेंटरवर न येता परस्पर घरी जातील अशा व्यक्तींची माहिती स्किनींग सेंटर ला कळविण्याची जबाबदारी ग्राम/वाडी/नागरी कृतीदल यांच्याकडे देण्यात आली असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अध्यादेशाद्वारे जाहीर केली आहे.