राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

0
549
बातम्या शेअर करा

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे आज निधन झाले. ते 104 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अहमदपूर येथे अंतिम विधी केले जाणार आहे. त्यांचे पार्थिव नांदेडहून अहमदपूर या ठिकाणच्या भक्तीस्थळावर नेले जाणार आहे.

गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. काल (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र दुर्देवाने आज त्यांचे निधन झाले. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर हजारो भाविकांनी अहमदपूरजवळ गर्दी केली होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकमधील लाखो भक्तांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज कोण होते? -राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत. वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांनी दोन वेळा तुरुंगवासही भोगला होता.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here