माणगाव -(अजय होळकर ) – संपूर्ण जगावर कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचे संकट असताना ह्या वर्षी गणेश चतुर्थीच्या सणावर सुद्धा हे संकट उभे राहीले. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये एवढा मोठा उत्साह मात्र दिसून येत नव्हता. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन माणगाव तालुक्यातील गोरेगाव शहरातील गणपतींचे विसर्जन गोपाळ समाज्याच्या संपूर्ण नियोजना खाली सुरक्षित असे गोरेगाव मधील कालनदी तसेच विष्णु तलावमध्ये विसर्जन करण्यात आले. गोरेगाव पोलिस स्टेशनकडून व्यवस्थित बंदोबस्त करण्यात आला होता.
गोरेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक टोंपे यावेळी विसर्जन स्थळी आवर्जून लक्ष ठेऊन होते गणपतींचे विसर्जन करण्यासाठी फार मोजकेच भाविक उपस्थित होते. गोरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच जुबेर अब्बासी व उपसरपंच विनोद बागडे व सर्व सदस्य यानी योग्य नियोजन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले होते. तसेच श्री सदस्यांकडून गणपतीना वाहीलेले निर्माल्य पाण्यात न सोडता ते एका ठिकाणी साठवून ठेवण्याचे काम करण्यात येत होते जेणे करुण त्या पासून पाण्यात प्रदूषण होऊ नये. गोरेगावचा राजा, गोरेगावचा पहिला मानाचा गणपती व नवतरुन मित्र मंडळ हौदाची आळी ह्या सार्वजनिक गणरायची मिरवणूक न काढता नेमक्याच भविकांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.