रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 125 नवे रुग्ण सापडून आले आहेत. यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 53 तर अँटिजेन टेस्ट केलेले तब्बल 72 रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 057 वर पोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यामध्ये सर्वाधिक 37 रुग्ण खेड तालुक्यातील आहेत. नव्याने सापडलेल्या 125 रुग्णांमध्ये सर्वाधिक 72 रुग्ण हे अँटिजेन टेस्ट केलेल्या रुग्णांचे आहेत. यामध्ये खेडमधील 27 रुग्ण, गुहागर 3, चिपळूण 19, लांजा 4 रुग्णांचा समावेश आहे. तर आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांमध्ये रत्नागितील 16, दापोली 2, गुहागर 8, चिपळूण 13, मंडणगड 2, लांजा तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.