गुहागर -कोकणात आज गौरी सोबतच पाच दिवसाच्या गणपतीचे सुद्धा विसर्जना आजची ठिकाणी सुरू आहे. गणपती विसर्जन करते वेळी गुहागर तालुक्यात दोन जण बुडाल्याने या विसर्जनाला गालबोट लागले आहे.
गुहागर तालुक्यातील बोऱ्याजेटीवर आज सायंकाळी चारच्या दरम्यान गणपती विसर्जनासाठी गर्दी जमली होती. यावेळी या जेटीवर गणपती विसर्जन करताना वैभव देवळे व अनिकेत हवे असे दोघेजण दुर्दैवी रित्या बुडाले. स्थानिकांच्या मदतीने यांचा शोध सुरु आहे मात्र गणपती विसर्जन करताना हे दोघं बुडाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.