चिपळूण – येथील हेल्प फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या ‘मनाधार’ या समुपदेशन केंद्राचा प्रारंभ नुकताच चिपळूणचे डीवायएसपी नवनाथ ढ़वळे यांच्या हस्ते झाला.
मनाधार स्वयंचलीत समुपदेशन केद्रातफॅ कौंटुबिक समस्या, हिंसाचाराची प्रकरणे हाताळली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संबंधित व्यक्तीला तज्ञांचा मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल. ज्यात कायदेविषयक सल्ल्याचाही समावेश असेल. तसेच स्त्री अत्याचार, मानसिक वा शारीरीक छळाबाबची प्रकरणे प्रामुख्याने हाताळली जातील. तसेच अतिशय संवेदनशील असलेल्या बाल अत्याचाराच्या घटनेत संस्था पूर्णपणे पाठीशी उभी राहणार आहे. याचबरोबर ताणतणाव, चिंता तसेच व्यावसायिक, नोकरिची चिंता याबाबत तज्ञांचा सल्ला, युवा वर्गासाठी करियर मार्गदर्शनही केले जाणार आहे. या उपक्रमास डीवायएसपी ढवळे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश कदम व कार्यकारिणी सदस्य दिपक शिंदे उपस्थित होते. गरजुंनी संस्थेचा हेल्पलाईन क्रमांक 703877032 वर संपर्क करावा असे आवाहन संस्थेच्या उपाध्यक्षा अंजली कदम यांनी केले आहे