बोगस ई-पास प्रकरण; गुहागर तालुक्यातून मनसेच्या कार्यकर्त्याला नाशिक पोलीसांनी केली अटक

0
970
बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यात कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यावर एका जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी शासनाने ई-पास सुरु केले.मात्र या ई-पास मध्ये प्रचंड प्रमाणात बोगसपास मिळत असल्याच्या तक्रारी झाल्यावर या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातून मनसेच्या एका कार्यकर्त्याला नाशिक पोलिसांनी अटक केल्याने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

कोरोना संक्रमण काळात अत्यावश्यक सेवा म्हणून राज्यात ई-पास सेवा सुरुवात झाली मात्र यावेळी हे पास फक्त हे ठराविक लोकांनाच मिळतात किंवा पैसे दिल्यावरच मिळतात असा आरोपही करण्यात आला. मनसेचे संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात राज्य शासनावर गंभीर आरोप केले होते. की सर्वत्र दलाली सुरू असून राज्य शासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुहागर तालुक्यात बोगस ई-पासच्या या कारवाईमध्ये गुहागर मनसे संपर्क सचिव सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.गुहागर तालुका संपर्क सचिव असलेला राकेश सुर्वे हा बोगस ई-पास बनवत असल्याची खबर नाशिक पोलिसांना लागली आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी थेट गुहागर गाठले. गुहागर तालुक्यातील पडवे गावातून राकेश सुर्वे ला अटक करण्यात आली असून नाशिक पोलिस त्याला अधिक तपासासाठी नाशिकला घेऊन गेले आहेत. याबाबत गुहागर पोलिस स्टेशनला संपर्क साधला असता त्यांनी नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली व अधिक तपासासाठी त्याला नाशिकला घेऊन गेले असल्याचे सांगितले.

मनसेचा कार्यकर्ता बोगस ई -पास मध्ये सापडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मनसेने राज्यातील हा घोटाळा उघड करण्याचा प्रयत्न करत असतानाच मनसेचा कार्यकर्ता यात सापडल्याने खळबळ माजली आहे. राकेश सुर्वे हा डोंबिवली येथे राहणार असून गणपतीसाठी तो आपल्या मूळ गावी आला होता. त्यामुळे ठाणेसह आता गुहागर तालुक्यात अजून अशी मोठी साखळी आहे का ? यात अजून किती जण आहेत. याचा तपास नाशिक पोलिस करणार आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here