कोकणातील गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जारी

0
600
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – कोकणातला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असे असले तरीही कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस प्रशासनाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्या गाईडलाईन्स पाळूनच कोकणवासियांना गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करावे लागणार आहे.

कोकणातील गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जारी

सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी नाही
घरगुती गणेश मूर्ती शक्यतो शाडूच्या असाव्यात.
घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिमरित्या घरीच करावे
सार्वजनिक गणेशमूर्ती जास्तीत जास्त चार व्यक्तीने वाहनातून जाऊन करावे.
सार्वजनिक गणपतीच्या आरतीसाठी जास्तीत जास्त चार लोक सोशल डिस्टन्सिंग ठेवून एकत्र येऊ शकतात.
घरगुती गणपतीच्या आरतीसाठी घरातील व्यक्तींनी सहभागी व्हावे
पारंपारिक पद्धतीने एकमेकांच्या घरी जाणे टाळा.
आगमनासाठी गर्दी करु नका

त्याशिवाय यंदा गणपती विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून मूर्तीचे संकलन केले जाणार आहे. विसर्जनासाठी प्रशासनाकडून पेंडॉलही उभे केले जाणार आहेत. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी आरती करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here