चिपळूण- चिपळूण राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते आणि त्यांच्या पत्नी खेर्डीच्या माजी सरपंच जयश्री खताते यांच्या विरोधात खेर्डी नळपाणी योजने संदर्भात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणात आला होता. या प्रकरणी जयंद्रथ खताते व जयश्री खताते यांनी चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. यावर जिल्हा व सत्र न्यायालयाने खताते यांचा अर्ज नामंजूर केला होता. या विरुद्ध खताते यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने खताते यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या ऑनलाइन सुनावणी मध्ये जयंद्रथ खताते व जयश्री खताते यांच्या वतीने अॅड. हर्षद भडभडे,अॅड नितिन केळकर यांनी काम पाहिले. त्यांच्या सोबत अॅड. ऋषिकेश थरवळ आणि अॅड. सोहम भोजने हे देखील या वेळी उपस्थित होते.