गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांची फसवणूक करतात या फसवणुकीला कंटाळून काल मयूर भोसले आणि तानाजी चव्हाण यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते.ही बातमी लावल्याने प्रशासनाला जाग आली आणि अखेर 15 सप्टेंबर पर्यंत फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे देणार असल्याचे रत्नागिरी येथील कार्यालयातुन फोनद्वारे सांगण्यात आले.
प्रगती टाइम्स च्या या सडेतोड वृत्ताबद्दल आम्ही प्रगती टाइमचे आभारी आहोत. यापुढेही प्रगती टाइम्स असेच सडेतोड वृत्त देऊन आम्हाला सहकार्य करावे. असे मयूर भोसले ,तानाजी चव्हाण यांनी प्रगती टाइम्स’शी बोलताना सांगितले.