गुहागर – नावाजलेल्या अशा बजाज फायनान्स कार्यालयाला फसवणूक करत असल्याने शुंगारतळी येथील ग्राहकांनी अखेर आज टाळे लावले. त्यामुळे बजाज फायनान्स कंपनी आता हे कार्यालय पुन्हा उघडणार का ?याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे .
शृंगारतळी येथील ग्राहक मयूर भोसले आणि तानाजी चव्हाण यांनी या कार्यालयातील कर्मचार्यांना अनेक वेळा कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना आणि आपल्या अधिकाऱ्यांना ही समस्या दूर करायला सांगा असे सांगितले. मात्र कंपनी आज पाहतो उद्या पाहतो असे सांगून टाळाटाळ करत होती. या कंपनीचे या परिसरात अनेक ग्राहक असून कंपनी जर ग्राहकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन ग्राहकांना त्रास देऊन लुटमार करीत असेल तर आम्ही अशी कंपनी शृंगारतळी परिसरात चालू देणार नाही. असा पवित्रा घेत अखेर आज युवा नेते मयूर भोसले व तानाजी चव्हाण यांनी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढत या कार्यालयाच्या शटरला कुलूप मारले. त्यामुळे आता बजाज कंपनीचे अधिकारी येथील ग्राहकांची होणारी फसवणूक थांबून येथील कार्यालय पुन्हा उघडणार का ? याची चर्चा संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे. तर ग्राहकांची होणारी फसवणूक लक्षात घेऊन हे कार्यालय मयूर भोसले आणि तानाजी चव्हाण यांनी बंद केल्याने त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/08/IMG-20200820-WA0036-1-1024x985.jpg)