बातम्या शेअर करा

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल एकशे सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक कर्मचारी रत्नागिरी तालुक्‍यातील आहेत. त्या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.
कोरोनाच्या या कालावधीत या कोव्हिडं योद्धाना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १०० कर्मचारी आणि ७ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुतांशी कर्मचाऱ्यानी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुंडे यांनी रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे पोलीसांसाठी कोरोना सेंटर सुरू केले आहे, याचा चांगला फायदा पोलिसांना होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here