गुहागर – गुहागर तालुक्यातील पालशेत हे गाव शासनाच्या निर्मल सागर तट अभियानामध्ये असून गेल्या काही वर्षात समुद्रकिनाऱ्यावर शासनाचे निधीमधून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम करीत सुरु आहे. मात्र, कोरोनाच्या या कालावधीत या समुद्रकिनारी अवैधपणे वाळु उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.