बातम्या शेअर करा

गुहागर -गुहागर तालुक्यातील सर्वात महत्वाची अशी  पाटपन्हाळे ग्रामपंचायतने या तालुक्यात  प्रथम क्रमांक  पटकावला आहे. या पुरस्काराचे वितरण आज  रत्नागिरीचे प्रांताधिकारी व  रत्नागिरीचे तहसीलदार यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.यावेळी हा  स्विकारण्यासाठी पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार, माजी सरपंच तसेच श्रुंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजितभाऊ  बेलवलकर, गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार दिनेश  चव्हाण, ग्रा.वि.अधिकारी आर.जि. बेंडल, निखिल बेंडल आदी उपस्थित होते.तालुक्यात सर्वात प्रथम कोरोनाचा रुग्ण हा शृंगारतळी मध्ये सापडला होता. त्यावेळी येथील कोरोना  संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात आले होते. आणि त्याला यश आले होते. या केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आजही शुंगारतळी आणि पाटपन्हाळे परिसर हा संक्रमणापासून  दूर असल्याने सरपंच संजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here