देवरुख; चिंताजनक एस टी आगाराचा वाहक कोरोनाबाधित

0
272
बातम्या शेअर करा

देवरुख – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आता संगमेश्वर तालुक्यातील देवरुख एस टी आगाराचा वाहकच पाॅझिटिव्ह आढळुन आल्याने चालक -वाहक- कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी आणण्यासाठी नियोजन सुरु असतानाच ही घटना घडल्याने चालक वाहक धास्तावले आहेत. गणेशोत्सवात चाकरमानी यांना आणणे सोडणे याचे नियोजन सुरु असतानाच एक वाहक पाॅझिटिव्ह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. एस टी ने सर्व सुरक्षा नियम पाळुन प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य जपले. देवरुख आगारातील चालक वाहकांनी मुंबईत जावून परप्रांतियांना त्या त्या जिल्ह्यात जावून सोडण्यात कोविड योद्याची भुमिकाही निभावलेली आहे. देवरुख शहरात पाॅझिटिव्ह रुग्ण आढळुन आले नव्हते माञ जे पाच आढळले त्यात एक वाहक निघाला यामुळे चालक ,वाहक,कर्मचारी यांच्यात संभम्रावस्था निर्माण झाली आहे. यासाठी सर्वांनीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे बनले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here