गुहागर – मुंबई विद्यापीठाने नुकत्याच आयोजित केलेल्या ५८ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवातील अंतिम फेरी मध्ये पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायातील नेत्रा प्रसाद पाध्ये (द्वितीय वर्ष वाणिज्य) हीने वक्तृत्व स्पर्धा मराठी गट अ मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच कोलाज स्पर्धेत ऋषिकेश राजेंद्र नांदलस्कर (द्वितीय वर्ष कला) याने उत्तेजनार्थ मिळविले. यावेळी ऋषिकेश नांदलस्कर याने ऑन द स्पॉट पेंटीग व व्यंगचित्र या स्पर्धातही आपला सहभाग नोंदविला.
यावेळी सदर स्पर्धेत साहिल आग्रे (तृतीय वर्ष कला), सिद्धेस डिंगणकर (तृतीय वर्ष कला), प्रणय पालकर (प्रथम वर्ष वाणिज्य), साक्षी पवार (द्वितीय वर्ष वाणिज्य),. कीर्ती साळवी (द्वितीय वर्ष वाणिज्य), मिताली शिगवण (प्रथम वर्ष वाणिज्य) या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वतीने भारतीय समूह गीत सादर केले. तर सिद्धेस डिंगणकर (तृतीय वर्ष कला), निखिल टानकर (द्वितीय वर्ष वाणिज्य), साहिल शितप (प्रथम वर्ष वाणिज्य), रतिका सोलकर (प्रथम वर्ष कला), साक्षी पारदळे (प्रथम वर्ष वाणिज्य), समृद्धी घाणेकर (द्वितीय वर्ष वाणिज्य) या विद्यार्थ्यांनी गट सी मधून हिंदी भाषेतील ‘झगडा’ हे स्कीट सादर केले. साहिल आग्रे (तृतीय वर्ष कला), याने कथालेखन व स्पाॅटबाॅय तर शुभम मांडवकर (तृतीय वर्ष कला) याने पोस्टर मेकिंग या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या वतीने सदर स्पर्धेत एकूण ७ विविध कलाप्रकारात सहभाग घेतला होता सर्व यशस्वी व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये. प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम व रत्नागिरी येथील कोरियोग्राफर अक्षय पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाची व सांस्कृतिक विभागाच्या कार्याची दखल घेत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी यशस्वी विद्यार्थाचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.