गुहागर – कलासंवर्धन व कलाकारांना प्रोत्साहन या उद्देशाने गेल्या १५ वर्षांपासून कलाक्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कला अभिनव ग्रुप शृंगारतळी तर्फे तीन दिवसीय व्यावसायिक दर्जाची अभिनय कार्यशाळा २६ सप्टेंबर २०२५ पासून शृंगारतळी येथे सुरू झाली आहे.या कार्यशाळेला “चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे, सिनेअभिनेते सुदेश जाधव, तसेच नाट्यक्षेत्रातील दिग्गज डॉ.नारायण खराडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या संपूर्ण कार्यशाळेसाठी विशेष सहकार्य सोनल गुहागरकर, कला विश्व क्लासेस, सिद्धेश नाटेकर, बाबा संसारे, यांचे लाभले आहे. कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून सिनेअभिनेते “चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे (एम.ए. नाट्यशास्त्र), सुदेश जाधव (एम.ए. नाट्यशास्त्र), डॉ. नारायण खराडे ( PHD नाट्यशास्त्र) तसेच सिनेअभिनेते सचिन कांबळे कार्यरत आहेत.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पाटपन्हाळे गावचे उपसरपंच असीम साल्हे, शिवतेज फाऊंडेशन अध्यक्ष व ऍड. संकेत साळवी, लोकशाहीर रामचंद्र धोंडू मांडवकर, तुरेवाले शाहीर अशोक दत्ताराम कुंभार, तसेच लिटिल चॅम्प शाळा संस्थापक हेमंत शिरकर उपस्थित होते.
कला अभिनव ग्रुप तर्फे उमेश खैर, अजय नाईक, सुदेश हडकर, अमित कुबडे, कुणाल गमरे, राहुल जाधव, सुदेश गमरे यांनी या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून, सर्व मान्यवरांनी या अभिनय कार्यशाळेला भरघोस शुभेच्छा देऊन कलाकारांना प्रोत्साहन दिले. सदर अभिनय कार्यशाळेत 25 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला आहे.