चिपळूण – गवा रेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार ठार

0
915
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील गुढे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली.
गुढे येथील रवींद्र पांडुरंग आग्रे हे दुचाकीवरून जात असताना गवारेड्याने जोरदार हल्ला केला यामध्ये ते गंभीर जखमी झाले उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वीच कळंबट येते बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच अशीच घटना पुन्हा एकदा घडल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

रविंद्र आग्रे हे चिपळूण कडे निघाले असताना अचानक त्यांच्या दुचाकी समोर गवा रेडा आला आणि त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चुराडली गेली, आग्रे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. रस्त्यावरून जात असलेल्या एका नागरिकाच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आग्रे यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्याबरोबरच या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here