बातम्या शेअर करा

आबलोली – गुहागर तालुक्यातील खारवी समाज सभागृहात ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांचा मेळावा झाला त्याच ठिकाणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण करणार आहेत. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे व आमदार उदय सामंत व पक्ष सोडलेल्या आपल्या सहकाऱ्यांबाबत काय बोलणार याबाबत सगळीकडे एकच राजकीय चर्चा सुरू आहे.

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, 6 तारखेला तुम्ही प्रत्यक्ष बघा माझ्याबरोबर कीती जनसमुदाय येतो. ते माझ्या पक्षातील चार कार्यकर्ते गेले असले तरी चाळीस कार्यकर्ते निर्माण करण्याची धमक माझ्यात आहे. आणि ते तुम्हाला उद्या जाहीर मेळाव्यातून दिसून येईल. मी कृती करून दाखवतो असा मार्मिक टोलाही विरोधकांना आमदार भास्कर जाधव यांनी हाणला. त्यामुळे 6 ऑगस्टला हेदवतड येथे आमदार भास्कर जाधव यांची तोफ धडाडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळाव्याचा विक्रम तोडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here