वरवेली – (गणेश किर्वे ) – महसूल विभाग गुहागर मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नुकतेच गुहागर शहरातील ज्ञानरश्मी वाचनालय सभागृह
संपन्न झाले.
या शिबिरात ऍग्री स्टॅग नोंदणी करण्याचे शिल्लक असलेले लाभार्थी यांची सेल्फ रजिस्ट्रेशन द्वारे नोंदणी करण्यात आली ग्राममहसूल अधिकारी मनीष शिंदे यांनी ई पीक पाहणी बाबत, आनंद घागरे यांनी सलोखा योजना याबाबत माहिती दिली .मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे यांनी सेवा दूत योजनेबाबत प्रात्यक्षिक करून सविस्तर माहिती दिली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्पन्न दाखले, नॉन क्रिमीलेअर दाखले ,वय अधिवास दाखले, इत्यादी दाखले तसेच नवीन शिधापत्रिका आणि विशेष अर्थसहाय्य योजना लाभ मंजुरी आदेश यांचे वितरण करण्यात आले. विशेष अर्थसहाय्य योजना लाभार्थी यांचे डिजिटल हयात दाखले काढण्याचे कामकाज करण्यात आले फेरफार अदालत मध्ये फेरफार प्रमाणित करून सातबारा आणि आठ फेरफार यांचे वाटप करण्यात आले. जिवंत सातबारा टप्पा दोन अंतर्गत नागरिकांकडून प्राप्त अर्ज दाखल करून घेण्यात आले
या शिबिरामध्ये निवासी नायब तहसीलदार विद्याधर वैशंपायन ,पुरवठा निरीक्षण अधिकारी भावना दाताळे ,संजय गांधी सहाय्यक महसूल अधिकारी वासावे गुहागर मंडळातील मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, ग्राम महसूल अधिकारी सुशील परिहार, राधा आघाव, मनिष शिंदे, आनंद घागरे, महसूल सेवक अमित जोशी ,पंकज आगरे, कल्पेश पवार, श्वेता निकम गुहागर मंडळातील आरे ,धोपावे, वेलदूर, अंजनवेल, रानवी ,असगोली, वरवेली या गावचे सरपंच पोलीस पाटील आणि शासकीय योजनांचे लाभार्थी, मतदार ,शेतकरी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.