गुहागर – पंतप्रधानांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी घरकुल योजना सुरू केली. मात्र या योजनेचा खरोखरच सर्वसामान्य व्यक्तींना लाभ मिळतो का असा प्रश्न आता पडू लागलाय त्याला कारणही तसेच आहे. गुहागर तालुक्यातील गिमवी येथील विद्यमान सरपंच असलेल्या एकाच कुटुंबातील तीन भावांना एकाच वेळी घरकुल मंजूर झाल्याने सध्या हा विषय चर्चेचा बनला आहे.
गुहागर तालुक्यातील गिमवी – देवघर या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सध्या वैभवी जाधव या महिला सरपंच आहेत. त्यांच्या तीन मुलांना नुकत्याच जाहीर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या यादीप्रमाणे तीनही मुलांना घरकुल मंजूर झाले आहेत. त्यामुळे सध्या हा विषय खूप चर्चेचा बनला आहे. आई सरपंच आणि तीन मुलांना घरकुल कसं काय मिळू शकतं याबाबत सध्या एकच चर्चा सुरू आहे. या संदर्भात गिमवी या गावातील काही ग्रामस्थांनी गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार काय आहे.? एकाच कुटुंबातील तीन भावांना एकाच वेळी घरकुल मंजूर होते का.? असे अनेक प्रश्न त्या निमित्ताने पडले आहेत. या प्रकरणाबाबत शेखर भिलारे यांनी असे सांगितले की. विस्तार अधिकारी यांना संबंधित प्रकरणाची पडताळणी करून कोणत्या नियम आणि अटीच्या आधारे हे घरकुल मंजूर झाले आहेत. त्याची संपूर्ण चौकशी करून कागदपत्रांचा अहवाल तपासून सादर करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.