एसटी बसमध्ये दिव्यांगांना जागा न दिल्यास होऊ शकतो तुरुंगवास नियम मोडल्यास ५ हजारांचा दंड

0
1
बातम्या शेअर करा


मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील दरवाजाजवळ चार आसन क्रमांक तीन, चार, पाच व सहा कायमस्वरूपी दिव्यांगांसाठी राखीव ठेवली आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झालेला हा अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आला आहे. दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मानजनक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम कोणी मोडल्यास पाच हजारांच दंड आणि दंड न भरल्यास तुरुगांत पाठवून त्या मजुरीतून दंड वसूल करण्याची तरदूत नियमात आहे.
दिव्यांग प्रवासी कोणत्याही प्रवाशांच्या सेवेस एसटी महाराष्ट्र राज्य परिवहन जय महाराष्ट्र बसस्थानकावरून बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसनांवर बसण्याचा हक्क असेल. याआसनांवर सामान्य प्रवासी बसले असतील तर त्यांनी ते तत्काळ रिक्त करणे बंधनकारक आहे.

वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना त्यांचे हक्काचे आसन देण्यासाठी सजग राहावे आणि प्रवासादरम्यान कोणत्याही अडथळ्याशिवाय दिव्यांगांची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा आहे. एसटी बस वाहकावर प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारीदेखील असेल. एसटी महामंडळाने प्रवाशांमध्ये या निर्णयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांना प्रति आसन पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल. जर दंड भरण्यास नकार दिला तर संबंधिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here