दिल्ली निवडणुक ; अरविंद केजरीवाल यांचा पराभव, ‘आप’ला मोठा झटका

0
1
बातम्या शेअर करा

नवीदिल्ली- आम आदमी पक्षाचे संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.

आपचे माजी मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचादेखील पराभव झालाय. त्यांच्यापाठोपाठ आता अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या पराभवासह त्यांचं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. भाजपने 45 पेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारल्याने आप आता सत्तेबाहेर जाणार असल्याचं स्पष्ट आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. यानंतर आज मतमोजणी पार पडत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासूनच भाजप आप पक्षापेक्षा जास्त आघाडीवर दिसत आहे. भाजपने या निवडणुकीत तसं वातावरण देखील निर्माण केलं होतं. भाजपने या निवडणुकीत प्रचंड ताकद लावली होती. तसेच घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला होता. परिणामी, आता दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन होताना दिसत आहे. कारण भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळताना दिसतोय.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here