चिपळूण – जिल्हाभरात होणारी गुरांची बेकायदेशीर वाहतूक ही संघटीत गुन्हेगारी आहे. चिपळूणमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालीच पाहिजे, अशी आपली मागणी असून यासंदर्भात पोलिस प्रशासनाशी चर्चा केली आहे. येत्या अधिवेशनात गोवंश तस्करीप्रकरणी अजामीनपात्र कडक कायदा होण्यासाठी प्रयत्न करणारच अशी गर्जना आमदार निलेश राणे यांनी चिपळूणमध्ये केली यावेळी असंख्य हिंदू बांधवानी त्यांना टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभा चिपळूणमध्ये होत असली तरी आता पुढील सभा ही कराड येथे घेतली जाईल व गुरे तस्करी व गोमांस विक्रीचे पूर्ण रॅकेटच उद्ध्वस्त करून टाकू, असा इशारा आ. निलेश राणे यांनी यावेळी दिला. आपण संघटीतपणे आणि आक्रमकपणे याला विरोध करून गोमातेचे रक्षण केले पाहिजे, असे आ. राणे यावेळी म्हणाले.