रत्नागिरी – आज रत्नागिरी शहरातील जुना माळनाका, येथील एका 73 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 53 झाली आहे. पैकी रत्नागिरी तालुक्यात मृतांचा आकडा सर्वाधिक असून रत्नागिरीत आतापर्यंत 12 जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. तर खेड – 6, गुहागर – 2, दापोली – 11, चिपळूण – 9, संगमेश्वर – 6, लांजा – 2, राजापूर – 4, मंडणगड – 1 अशी तालुकानिहाय मृतांची आकडेवारी आहे. तर
जिल्ह्यात सध्या 197 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 20 गावांमध्ये, दापोली मध्ये 11 गावांमध्ये, खेड मध्ये 60 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 88 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 , गुहागर तालुक्यात 9 आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.