बातम्या शेअर करा

खेड – रत्नगिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील घरडा केमिकल्स या कंपनीने जवळपास 2400 स्वबची तपासणी केली गेली त्यात 281 पोजिटिव्ह रुग्ण आले आहेत. त्यामुळे खेड तालुक्यात सगळ्यात जास्त कोविडचा कहर लोटे येथील घरडा कंपनी मध्ये असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

या कंपनीने आपल्या काही कर्मचारी वर्गाचे स्वब पुण्याला तपासायला पाठवले होते.यामध्ये कंपनीचे कर्मचारी व कुटुंब यांचा सहभाग आहे. सद्या या कंपनीचे 65 कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती घरडा केमिकल्सचे अनिल भोसले यांनी दिली

खेड तालुक्यात आज पर्यंत एकूण 327 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले यात 224 रुग्ण बरे झाले आहेत. तर 7 जणांनचा मूर्त्यु झाला मात्र असे असले तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनमध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे लोटे येथील घरडा कंपनीचे आहेत.
ज्यावेळी या घरडा कंपनीत प्रथम कोरोना बाधीत रुग्ण सापडला त्याच वेळेला जर कंपनीने खबरदारी घेतली असती तर घरडा कंपनी हॉटस्पॉट ठरली नसती असे आता येथील कर्मचारी सांगत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here