गुहागर – गणेश उत्सवासाठी गुहागर तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी व्हावी तसेच गुहागर तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या शरीरातले ऑक्सीजनचे प्रमाण मोजणारे पल्स ऑक्सीमेंटर व ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य कर्मचारी ह्यांच्या मार्गर्शनाखाली आशा सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यामार्फत कोरोनाची लक्षण शोधणारे उपकरण अलोडिटेक्शन ऑफ सिंपरन्स बी पल्स अॅक्सीमेंटर ह्यांची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुहागर तहसीलदार यांना देण्यात आले.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी व्हावी तसेच गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांना त्यांच्या आरोग्याची प्राथमिक काळजी म्हणून त्यांना मास्क,सॅनीटायझर,द्यावेत अशी मागणी गुहागर पंचायत समिती व आरोग्य विभागाकडे मनसेच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर ह्यांच्या नेतृत्वाखाली ही निवेदन देण्यात आले. ह्यावेळी वाहतूक सेनेचे तालुका सचिव विनायक दनदणे, सुनिल पागडे, कौस्तुभ कोपरकर, संतोष खांबे, प्रमोद राऊत,रुपेश बारगोडे, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.