चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील नातू प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या MS-CIT सॅटेलाइट सेंटरचे उद्घाटन थाटामाटात पार पडले.
या सॅटेलाइट सेंटरमुळे शाळेतील व परिसरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. एमएससीआयटी कोर्ससोबतच या सेंटरद्वारे विद्यार्थी Tally, Advance Excel, Programming इत्यादी संगणक अभ्यासक्रमांसाठी देखील नावनोंदणी करू शकतात. संगणक शिक्षणाच्या द्वारे आता सर्वांसाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे. या प्रसंगी प्रशासक प्रमोद प्रभुणे म्हणाले की, “विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या आधुनिक संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे आणि नातू प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल. या सॅटेलाइट सेंटरमुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीसाठी एक नवी दिशा मिळणार आहे.या कार्यक्रमाला स्कूलचे प्रशासक प्रभुणे, मुख्याध्यापिका सोहनी, प्रा. बोट तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नातू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विनय नातू व स्कूल कमिटीच्या अध्यक्षा नीला नातू व सर्व संचालक यांनी हा उपक्रम त्यांच्या संस्थेमध्ये राबवण्यासाठी मोलाची साथ दिली आणि मार्गदर्शन केले. अध्यक्ष डॉ. विनय नातू व इतर संचालक यांच्या सहकार्यामुळे हे सॅटेलाइट सेंटर सुरु करणे शक्य झाले आहे. या सोहळ्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते