गुहागर – महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना कोणताही विभाग, संस्था अथवा महामंडळ यांचे मार्फत लाभ मिळत नाही अशा युवकांना संगणक कौशल्यात विकसित व प्रशिक्षित बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणे आणि उद्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वावलंबनाला चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी ‘अमृत’ आणि MKCL मध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारा अंतर्गत MKCL मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही निवडक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवड झाल्यावर लाभ देण्यात येईल. ‘अमृत’ तर्फे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या युवकांना MKCL चे अधिकृत केंद्र युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, कॅनरा बँकेच्यावर, शृंगारतळी येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यासंबंधी सर्व माहिती अमृतच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे. अमृतच्या लक्षित गटातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन MKCL च्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर येथे 9657898382 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.