
गुहागर – गुहागर तालुक्यातील पालशेत या भागात आज मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस पडला त्या पावसामुळे येथील सावरपाटी भागात पाणी भरले असून ७-८ घरात पाणी शिरले आहे.

त्याचप्रमाणे पालशेत येथील आगडीमंदिर येथील योगेश जाक्कर यांच्या घरात मागच्या बाजूस दरडीचा भाग कोसळ्याने माती घरात आली आहे. तर पाच माड भागात सुद्धा काही घरात पाणी शिरले आहे. प्रशासन सध्या झालेल्या नुकसानाचा पंचनामा करत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
