गुहागर ; श्री शृंगारतळीचा राजाचे थाटात विसर्जन

0
165
बातम्या शेअर करा

शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी बाजारपेठ यांचा श्री शृंगारतळीचा राजाचे थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत निरोप दिला.

गुहागर ; बँकांकडून कर्जे घेऊन काही बचतगटांचे सावकारी धंदे..?

भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून या शृंगारतळी राजाची ख्याती आहे. या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी प्रतिष्ठापना केल्यापासून दर्शनासाठी गर्दी केली होती. दररोज आरती, भजन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राजकीय पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे शृंगारतळी बाजारपेठ मध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या गुहागर पोलिसांचा देखील सत्कार करण्यात आला होता. भव्य दिव्य श्री शृंगारतळी राजाची बाजारपेठ मध्ये विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. श्री शृंगारतळी राजाचे मोडकाआगर धरणामध्ये रात्री विसर्जन करण्यात आले. उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी बाजारपेठचे अध्यक्ष अरुण गांधी, उपाध्यक्ष रुपेश भोसले, खजिनदार तानाजी चव्हाण, सचिव मयूर भोसले यांच्यासह सर्व कार्यकारीणी सदस्य तसेच सर्व जाती धर्मातील भाविकांनी विशेष मेहनत घेतली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here