गुहागर विधानसभा ; शिवसेनेकडून कुणबी समाजाचा उमेदवार म्हणून शरद शिगवण यांच्या उमेदवारीची मागणी

0
447
बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले त्यातच राज्य भरात एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार लढत होणार असली तरी अनेक ठिकाणी मात्र अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमार्फत कुणबी समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

गुहागर विधानसभा मतदार संघात कुणबी समाज बहुसंख्य आहे. आणि आजपर्यंत कित्येक वर्षे सर्व राजकीय पक्षांच्या पाठीशी राहून त्यांना आमदार ,खासदार बनविण्यास मतदानाच्या माध्यमातून व पक्षवाढीच्या कामात सहकार्य करत राहीला. यावर्षी म्हणजे 2024 च्या लोकसभेतील मताच्या टक्केवारीत ही आकडेवारी दिसून आली आहे. त्यामुळे या विधानसभेमध्ये गुहागर विधानसभेची उमेदवारी ही महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मिळावी आणि पक्षाकडून कुणबी समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी शिवसेना पक्षातील कुणबी समाजाच्या शिष्ठमंडळाने नुकतीच शिवसेना नेते रामदास कदम यांची मुंबई येथील पालखी या निवास स्थानी भेट घेऊन केली.यावेळी गुहागर व चिपळूण तालुक्यातील कुणबी समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

येणाऱ्या विधानसभा निवडणूकित शिवसेना पक्षाकडून गुहागर मतदार संघात बहुसंख्य असणाऱ्या कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देऊन समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. गुहागर विधानसभेची ही जागा शिवसेना पक्षाची असल्याने महायुतीत शिवसेनेला ती सुटेल आणि ती कुणबी समाजातील एक आक्रमक व प्रशासनावर पकड असणाऱ्या आणि माजी सभापती राहिलेल्या तसेच कुणबी समाज उन्नत्ती संघामध्ये सल्लागार असणाऱ्या शरद शिगवण यांना मिळाल्यास गुहागर विधानसभेमधून बऱ्याच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कुणबी समाजाचा आमदार विधानसभेत पाठविण्याचा कुणबी समाजबांधवांनी चंग बांधला आहे. याच मागणीसाठी शरद शिगवण यांनी गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यात सामाजिक स्थरावर बैठकांचे सत्र व मतदारांच्या भेटीगाठी चालू केल्या असून त्याला समाजातील लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. याबाबत लवकरच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनाही कुणबी समाजाचे एक शिष्टमंडळ भेटून आपले निवेदन देणार आहे.
महायुतीकडून भाजपमधून माजी आमदार विनय नातू यांनी आपली निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच आता महायुतीमध्येच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कुणबी समाजाच्या उमेदवार दिला जावा अशी मागणी केली जात असल्याने महायुतीमधून ही जागा नक्की कोणाला सुटणार याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here