बातम्या शेअर करा

मुंबई – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्य नागरीकांची लाईफलाईन असलेली लोकल बंद असून,काही दिवसांपूर्वी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरीकांसाठी ही सेवा सुरू न केल्याने नाराज व्यक्त केली जात असतानाच अशात आज मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी मुंबईत लोकल सेवा केव्हा सुरू केली जाईल याबाबत मोठा खुलासा केला आहे.

सध्या मुंबईत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करण्यात येईल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केले आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या एक टक्क्यावर आली,तरच मुंबई अनलॉक होईल, असे चहल यांनी सांगितले. मुंबईसोबतच उपनगरांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईच्या महानगर क्षेत्रातील रुग्णवाढ थांबवणे गरजेचे आहे, अन्यथा संसर्ग वाढत राहील, असेही चहल म्हणाले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here