गुहागर – गुहागर तालुक्यातील उमराठ जिल्हा परिषदेच्या शाळेत बिबट्याबरोबर मुलं खेळत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली मात्र हा व्हिडिओ काही दिवसापूर्वीचा असून सध्या या व्हिडिओमधील दिसणारे ते बिबट्याच पिल्लू सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले असून शाळेच्या आवारात बिबट्याचे पिल्लू ज्यांनी आणले त्यांच्यावर आणि शाळेच्या शिक्षकांवर कारवाई करणार असल्याचे वनविभागाच्या अधिकारी राजश्री कीर यांनी सांगितले यासंदर्भात त्यांना नोटीस पाठवली असून त्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
गुहागर तालुक्यातील उमराट येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत या शाळेतील विद्यार्थी बिबट्याच्या पिल्लासोबत खेळत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बातमी वनविभागाला समजतात वनविभागाने तात्काळ त्याची दखल घेत याबाबत खुलासा केला सदर घटना घडली हे सत्य आहे. मात्र आता ते बिबट्याचे पिल्लू सुरक्षित ठिकाणी सोडले असून शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा गावातील नागरिकांना त्याबाबत कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितलं मात्र अशा प्रकारे गावात बिबट्याचे पिल्लू आले असताना ते वनविभागाच्या अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवल्याने संबंधित व्यक्तींना आम्ही नोटीस पाठविली आहे असे त्यांनी सांगितले.
आमच्या गावात काही दिवसापूर्वी हे बिबट्याचे पिल्लू काही नागरिकांना बेवारस आढळून आले होते. त्यावेळी काही चुका आमच्या गावातील नागरिकांकडूनही झाल्या होत्या मात्र आम्ही तात्काळ आमच्या गावात बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती वनविभागाला दिली होती त्यानंतर वनविभागाने संबंधित बिबट्याच्या पिल्लाला घेऊन सुरक्षित स्थळी सोडले असल्याचे उमराटचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले.
गुहागर ; जिल्हा परिषद शाळेत मुलांसोबत खेळतय बिबट्याच पिल्लू..!
ज्या शाळेत हे बिबट्याचे पिल्लू विद्यार्थ्यांच्या सोबत आढळले त्या शाळेतील पालकांनी मात्र आपल्या संबंधित विभागाला किंवा वनविभागाला याबाबत काही माहिती दिली होती का याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे तसेच शिक्षण विभाग आता या शिक्षकांवर नक्की कोणती कारवाई करणार याची चर्चा ही सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे.